Surprise Me!

तारण्याचं झालं 'कोळस' आणि म्हाताऱ्याला आलं 'बाळसं' | Amazing Videos | Interesting Videos

2021-09-13 8 Dailymotion

या आधी आम्ही आपणास एका महिलेची 38 मुलांची वार्ता सांगितली होती. तिचा वाणवा पाकिस्तान पर्यंत जाऊन पोहचला आणि ही बातमी समोरे आली पाकिस्तानातील एका व्यक्तीला 36 मुलं असूनही त्यांचा वंशविस्तार अजूनही थांबलेला नाही. गुलजार खान असे या व्यक्तीचे नाव असून त्यांचे वय साठच्या आसपास आहे. गुलजार खान यांनी तीन लग्नं केली आहेत. या तीन पत्नींपासून गुलजार यांना आतापर्यंत 36 मुलं झाली असून लवकरच त्यांची पत्नी आणखी एका बाळाला जन्म देणार आहे. गुलजार खान यांची पत्नी, मुले आणि नातवंडे असा मिळून 150 जणांचा परिवार आहे. इस्लामाबादमध्ये राहणाऱ्या गुलजार खान यांना या गोष्टीचा मोठा अभिमान वाटतो. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांचा भाऊ मस्तान यांनाही तीन पत्नी असून एकूण 22 मुले आहेत. याबाबत मस्तान यांना विचारले असता ते म्हणतात, माझा अल्लाहवर पूर्ण विश्वास आहे. तो जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला अन्न देईल, अशी माझी श्रद्धा आहे. कुटुंबाचा पसारा वाढल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची त्यांना अजिबात चिंता नाही. पाकिस्तान लोकसंख्येच्या बाबतीत जगात पाचव्या क्रमांकांचा देश आहे. <br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon